कोण आला हा सैरभैर घेऊनी वर्षाव प्रेमाचा? विसरूनी गेलो रंगात ह्या आपण प्रहार दुःखचा. रंगाने मी बहरूनी गेले थिरकले मी त्या मोरापरी, स्तब्धलेले पंख पसरूनी फुलले मी त्याच्या पंखापरी. हे रंग फक्त रंग नसून अश्रुंच्या स्वप्नातील आहे तो रंग , पाण्याने कदाचित पुसून जाईल तरीही नेहमी राहील पापण्यांच्या मनासंग काळा,निळा,लाल,पिवळा वेगळे असले तरीही ते रंगच आहे, रंग खऱ्या जीवनातदेखील रात्रीचे वा दिवसाचे आहे. असे वाटे जणू कोणाच्या तरी आगमनाचे स्वागत करी, चहू दिशा नव्याने जन्मलेल्या लहानग्या तान्ह्यापरी. उध्वस्तलेले जीवन आता पुन्हा नव्याने जन्मले, रुसून बसलेले वैर आता प्रेमाचे रंग घेऊनी उभे राहिले. तुटलेली ती दोरी जाता जाता तो जोडूनी गेला, पसरलेल्या त्या मोत्याना देखील रंगाने आपल्या सावरून गेला. ठेऊन गेला भेटवस्तू रंगपंचमीच्या हा सण, हर्षाने व प्रेमाने आता बहरून गेले हे सगळ्यांचे अंगण. About poem:- I have written this poem on the occasion of 'Rangpanchami' This is not just a fest...