शेवटचा श्वास
आई तू कुठे आहेस गं?
तुझ्या मांडीवरील झोप आता मला आठवते गं.
आठवते तुला जेव्हा तू म्हणायची अंगाई...
गोष्ट तुझी ऐकता ऐकता मध्येच मी झोपी जाई.
झोपला नाही तर जगच तु डोक्यावर घेई,
गोष्टी सांगून तू मला शुर वीरांच्या जगात नेई...
आता मी झोपायला जातो
तुझ्या अंगाईची खूप आठवण येते,
पण आई .....
इथे आता बंदुकांची गोळी
माझ्यासाठी अंगाई गाते.
अश्रू का गं वाहते तू?
ताईच्या लग्नासाठी ठेव साठवूनं,
उरातून वाहतो अश्रूंची धारा
तुझा प्रेम आठवूनं.
अगं प्रिये ...........
नको ...अशी रडू नकोस
फार अमूल्य आहे अश्रू माझ्यासाठी,
बनुच शकलो नाही मी
आमच्या संसाराची दुसरी काठी..
मी न पाहिलेल्या आमच्या तान्ह्याला
त्याच्या बापाचा गोड गोड पापा दे,
माझा विचार न करता
तू फक्त त्याला धीर दे.
सांग त्या सळसळत्या रक्ताला
आम्हा शुर वीरांची गाथा,
मातृभमीचे ऋण फेडायला
टेकायचा आहे इकडेच त्याला माथा .

Comments
Post a Comment