पिंजलेला ढग
आजही ढग कासावीस झाला
कोसळून देखील पुन्हा तो कोसळायला आला
तुझ्या अश्रुंचे प्रतिबिंब पाहून
नदीही तुझी तिकडे रडली
तुला सावरता सावरता
आपलंच अस्तित्व ती हरवून बसली
हिरवळ उधळणारा मेघराज
नकळत आज वादळ बनतो
केवढा भाग्यवान रे तू
कमीतकमी तुझे दुःख ,तू व्यक्त तरी करतो....
आजही ढग कासावीस झाला
कोसळून देखील पुन्हा तो कोसळायला आला
तुझ्या अश्रुंचे प्रतिबिंब पाहून
नदीही तुझी तिकडे रडली
तुला सावरता सावरता
आपलंच अस्तित्व ती हरवून बसली
हिरवळ उधळणारा मेघराज
नकळत आज वादळ बनतो
केवढा भाग्यवान रे तू
कमीतकमी तुझे दुःख ,तू व्यक्त तरी करतो....
Comments
Post a Comment