....मुलं व बाई...
मुलांनी वर्गात खूप मस्ती केली,
त्यांच्या आवाजाने बाई पूर्णपणे हादरून गेली.
ओरडून ओरडून तिच्या आवाजाने पाऊल मागे घेतले ,
तरीही "मी माझे पाऊल मागे घेणार नाही", असे
तिच्या हृदयाने झटकन म्हटले.
तिच्या प्रत्येक प्रेमळ प्रश्नांचे तिला कटूच उत्तर मिळाले,
मुलांना न दुखवता कसं-बसं तिनं वर्गाला व स्वतः ला सांभाळले.
तिही कदाचित बालपणीत अशीच करायची...
तिला याची जाणीव होती,
मुलांमधील दोष न काढता ती शिक्षिका बनण्यासाठी स्वतःला सक्षम बनवत होती.
हळूच करून घड्याळाचा काटा पुढे सरकला.....
खोड्या करणारा तो ही तिला आदराने आता बाई म्हणू लागला,
भूमी वरती ज्या वीजाबरोबर पाऊस कोसळत होता
तोही आता जमिनीच्या कुशीत झरा बनून वाहू लागला.
तिने दगडाला मोतीचे रूप देऊन एक सुंदर लांब माळ केली,
स्वतः कुंभारीण बनून तिने मातीच्या गोळ्यापासून
स्वतः कुंभारीण बनून तिने मातीच्या गोळ्यापासून
एक सुंदर आकृती तयार केली

Comments
Post a Comment