कोण आला हा सैरभैर
घेऊनी वर्षाव प्रेमाचा?
विसरूनी गेलो रंगात ह्या
आपण प्रहार दुःखचा.
रंगाने मी बहरूनी गेले
थिरकले मी त्या मोरापरी,
स्तब्धलेले पंख पसरूनी
फुलले मी त्याच्या पंखापरी.
हे रंग फक्त रंग नसून
अश्रुंच्या स्वप्नातील आहे तो रंग ,
पाण्याने कदाचित पुसून जाईल
तरीही नेहमी राहील पापण्यांच्या मनासंग
काळा,निळा,लाल,पिवळा
वेगळे असले तरीही ते रंगच आहे,
रंग खऱ्या जीवनातदेखील
रात्रीचे वा दिवसाचे आहे.
असे वाटे जणू कोणाच्या तरी
आगमनाचे स्वागत करी,
चहू दिशा नव्याने
जन्मलेल्या लहानग्या तान्ह्यापरी.
उध्वस्तलेले जीवन आता
पुन्हा नव्याने जन्मले,
रुसून बसलेले वैर आता
प्रेमाचे रंग घेऊनी उभे राहिले.
तुटलेली ती दोरी
जाता जाता तो जोडूनी गेला,
पसरलेल्या त्या मोत्याना देखील
रंगाने आपल्या सावरून गेला.
ठेऊन गेला भेटवस्तू
रंगपंचमीच्या हा सण,
हर्षाने व प्रेमाने आता
बहरून गेले हे सगळ्यांचे अंगण.
About poem:-
I have written this poem on the occasion of 'Rangpanchami'
This is not just a festival of colours but the festival of happiness and love.We tend to forget all our problems and worries .When I see these colours , I feel as if a peacock is dancing .
These colours are not just a colour but it's is a rainbow of our life . Similarly our life also have colours of happiness that is day and colours of sadness that is night.Both are equally important...Everywhere there is happiness which seems that all four directions are welcoming someone..It makes the bond of our loved ones very strong and bring the people close who had gone away from our life ...We might celebrate this festival for one day but it's essence lasts forever.....
Wish you all happy holi




Comments
Post a Comment