हे सगळे का घडले?

कोणजाणे नेमके काय घडले.....
खऱ्या जीवनात तिला एक सुंदर स्वप्न पडले.
हात कुणाचा मध्येच आला,
जणू कोणी पडल्यावर आयुष्यात उठवतो तिला.
ती उठली,ती सावरली
वाटले तिला जणू मिळाला तारा,
चातक पक्षीच बनून जणू
वाहू लागला तिचा वारा.
इंद्रधनुष्य आले जीवनात
होते धुके झाले नाहींसे ,
सगळीकडे आता फक्त
वाटू लागले हिरवे हिरवेसे.
मध्येच असे काय घडले...
रंग त्यांच्या जीवनात होते जे कधी हिरवे हिरवे,
त्यातच दूरवर पाहताच वाटे का आज पुन्हा धुके धुके?
डोळ्यातील पाणी सुकून गेले
कोण जाणे कुठे ते हरवले,
त्याच्या घरी जाणाऱ्या वाटा
कदाचित तिच्यावर रुसून बसले
परंतु.......हे सगळे असे का घडले?
One turning point came in her life.One person came in her life .He was like a beautiful dream in the real world . He was a wonderful part of her life.. All her problems disappearwd due to his arrival in her life.
Comments
Post a Comment