मी हरवले
नेमके काय चालतय मनातं............
कुणाच्या खांद्याचा आधार शोधू
ह्रदयातील या चार भिंतीच्या अंधारात.
प्रेमाची भाषा वेगळीच असते
कधी कुणाला हसवत असते,
कधी कुणाला रडवत असते
तर कधी ओठांवर हास्य व डोळ्यात पाणी आणत असते.
वळणावर भेटतात तुझ्या आठवणी
समूहाबरोबरही चालताना आता,
सुखद वेदना देऊन गेला
कोण जाणी कसं पाहता पाहता.
तळवे डांबरात भाजून गेले
निर्जीव आता झाले हे पाय,
नाजूक पद लोखंडी झाले
कळेना मलाच मला झाले काय....
रस्त्यावर नाही ती फुले आता
फक्त तिथे काटेच आहे,
तोडताना सुध्दा नाव ओठी
आसव्याबरोबर तूच आहे.
टकटक लावून बसली आता
त्या उजेड देणाऱ्या चंद्राकडे,
डोळ्यासमोर असूनही
नाही तो आता माझ्याकडे.
कैदी प्रमाणे झाले हे जीवन
बाहेर कसं येऊ सांग ना रे मला?
प्रेमाची चावी घेऊन ये
जर आठवण कधी आली माझी तुला.
खूप महिन्यानंतर जेव्हा मला तू पहिला
आसवं जमली डोळ्यांच्या कौलारातं,
खुप काही सांगायचे होते
परंतु गुंतले नयन फक्त तुला पाहण्यातं.
घाबरू नको...............
माझं मन दुखावलं म्हणून
भविष्यात कधी रडू नको,
मी तर तुझी आहेच सावली
परंतु यापुढं कधी कोणाचा हात सोडू नको.

Nice
ReplyDelete