कदाचित तुला माहीत नसेल
की अशीही एक व्यक्ती असेल
जी फक्त तुझ्याचसाठी रडेल
एवढेच नाही . . . .
तर ती तुझ्यासाठीसुद्धा मरेल
कदाचित तुला माहीत नसेल....
एक व्यक्ती अशीही असेल
जिचा जीव तुझ्यातच गुंतलेला असेल
नकळत तुला, ती फक्त तुलाच पाहत असेल
पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल.....
एक व्यक्ती अशीही असेल
जिचा लोभ तुझी संपत्ती नसून फक्त तुझा प्रेमअसेल
जी काळोखातही तुझ्या उजेडासाठी स्वतः जळेन...
पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...
एक व्यक्ती अशीही असेल
जिचा सूर्य तुलाच पाहून उगवत असेल
जी तुला चंद्रातही पाहत असेल
पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...
एक व्यक्ती अशीही असेल
जिला सगळीकडे तूच दिसत असेल
तुझ्या आठवणीने तिच्या डोळ्यात आसव्यांचा पूर येत असेल
पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...

Comments
Post a Comment