न सुचलेली कविता...
आज डोके का खाजवते?
शब्दांच्या गर्दीत का असे हरवते?
सुचत नाही आज एकही कविता..
काय लिहू माहीत नाही..
परंतु काही लिहिल्याशिवाय
मन रमतही नाही.
मन रमतही नाही.
मध्येच हे काय घडते!
यमक जोडताना
मुक्तछंद का डोकावतो..
मुक्तछंद का डोकावतो..
विचारांच्या पावसात
शब्दांची बीज उगवते
शब्दांची बीज उगवते
पावसात पाणी व
उन्हात सूर्य नसल्या सारखी दशा झाली,
तरीही ही दशा
नव्याने कवितेचा सूर्य उगवते
नव्याने कवितेचा सूर्य उगवते
Comments
Post a Comment