तुच.. अरे इकडे तिकडे काय बघतो? अंधारात का बसला आहे? काही जमत नाही म्हणून का तू लपला आहे? वेड्या जरा लक्ष टाक त्या चंद्राकडे, काळोखात ही सगळ्यांचं लक्ष आहे फक्त त्याच्याचकडे. पाहिलं? चंद्रातही भरपूर डाग आहे, म्हणून काय त्याने उजेड देणं थांबवलं आहे? नाही ना ! मग तू का अंधारात बसुन रडतो ? कलेच्या दिव्याचा प्रकाश सतत सगळीकडे पसरत असतो.. तो कसा आहे ,ती कशी आहे याचा विचार तू नको करू, तर मी कसा आहे? यावर विचार करायला तू कर सुरू. स्वतःला तुच्छ तू कधीच लेखू नको, उडणाऱ्या या मनाला स्वतः त असं कोंडून तरी ठेवू नको! पिंजऱ्यात तडफडणाऱ्या पक्षिसारखं झालं तुझं मन , वाऱ्याच्या झोक्याबारोबर निवांत जा तू पण.. मोठ मोठी वारूळ बनवणारी मुंगिच असते, सां ग बघू... ती काय इवली नसते? आता बस हं खूप झालं रडणं, डोळे पुसून घे बघू आणि बघ काय असत जगणं. वादळाला ही न घाबरणारा तो पर्वत बन.. कधीही न विझणारी अखंड ज्योत बन. कधी ही न तुटणारी ती दोरी बन , दोर...
Comments
Post a Comment