Skip to main content

Posts

Kavyamann

Recent posts
    पिंजलेला ढग आजही ढग कासावीस झाला कोसळून देखील पुन्हा तो कोसळायला आला तुझ्या अश्रुंचे प्रतिबिंब पाहून नदीही तुझी तिकडे रडली तुला सावरता सावरता आपलंच अस्तित्व ती हरवून बसली हिरवळ उधळणारा मेघराज नकळत आज वादळ बनतो केवढा भाग्यवान रे तू कमीतकमी  तुझे दुःख ,तू व्यक्त तरी करतो....                                            

असे मला वाटते

........असे मला वाटते.      वाटतं कधीतरी  अदृश्य मी व्हावे माझ्या इवल्याश्या दुनियेत  एकटीच मी राहावे उडणाऱ्या त्या पक्ष्यासारखे उंच मी उडावे उडता उडता त्या ढगांशी  खूप गप्पे मारावे त्या रडणाऱ्या पावसाला असेच मी पहावे मग त्याच्यांशी पैज लावून ढळा ढळा रडावे कोणाला कधीतरी डोळेभरून पाहावे मनातील काटे सगळे त्याच्या समोर तोडावे वाटलं कधी तर एकांतात मुखवटे काढावे मनातले वादळ कागदावर लिहून  जोरात  ते फाडावे पाण्यावरतील पान बनून  कुठेही दूर वाहावे लाजाळूचे झाड बनून  स्वतःला स्वतःच सावरावे पसरलेल्या मोत्यांना  ह्याच हातांनी आवरावे सूर्याच्या त्या किरणाला  आशेच्या मुठीत धरावे उजवाडाला पाहून  त्या काळोखाला विसरावे जीवनातील चक्रव्यूहात  फक्त तुलाच शोधावे  कधीतरी जीवनात किट्ट काळे पाषाण बनावे मग त्या वरती चढून मोठयाने ओरडवे मागे न वळता  पुढेच चालावे ढगफुटीचा पाऊस बनून धो धो कोसळवे मिठाप्रमाणे समुद्रारात  क्षणात विरघळावे वाटे मला हे सगळे मी ...

दोस्ती

                        **अपनी दोस्ती*** क्या कहू  मेरे लिए कौन हो तुम... अंँधेरे में जलने वाले दीपक हो तुम, हर दर्द का मेरे मरहम हो तुम मेरे हर खुशी का राज़ हो तुम।।१।।  मन के लबों पर तुम्हारे हँसी का सागर हो वसंत ऋतू के तुम  बहार हो।।२।। किसमे इतनी हिम्मत जो अपनी यारी तोड़ सके, इतनी मजबूत दोस्ती हैं जो समय के चक्र को भी मोड़ सके।।३।। रात में जब आँखे बंद हुई तब यादो की बारात तुमने लायी, फिर आंँखो में आँसू और लबों पर हँसी छायी।४।। बस इतना याद राखना पगलों... तुम्हारी चुप्पी मुझे रुलये सच कहू यारों... तुम्हारा प्यार और पागलपंती मुझको भाये।५।                                    

न सुचलेली कविता...

     न सुचलेली कविता... आज डोके का खाजवते? शब्दांच्या गर्दीत का असे हरवते? सुचत नाही आज एकही कविता.. काय  लिहू  माहीत नाही.. परंतु काही लिहिल्याशिवाय  मन रमतही नाही. मध्येच हे काय घडते! यमक जोडताना  मुक्तछंद का डोकावतो.. विचारांच्या पावसात  शब्दांची बीज उगवते पावसात पाणी व उन्हात सूर्य नसल्या सारखी दशा झाली, तरीही ही दशा  नव्याने कवितेचा सूर्य उगवते                                               

अनोळखा प्रवास

अनोळखा प्रवास बाहेर पडले कुठे तरी जायला म्हटले,"मी आज लवकर पोहचणार"! पहाटे बसमध्ये बसली हट्ट होता माझा "आज कशीही करून मी तिकडे जाणार". तशी नवीन नव्हती ती जागा परंतु रस्ता नवा होता, बसीचा तो आवाज कशाचा तरी संकेत देत होता. शेवटी ती ओळखीची जागा नजरेत पडली, म्हटलं बरं झालं ..आता मी पोहचत आली. थोड्या वेळात बघितलं तर सगळं दृश्यच बदललं, मला जिकडे जायचं होतं ते तर मागेच राहिलं. धीर दिलं मनाला  म्हटलं... "दुसऱ्या रस्त्याहून नेत असेल, एका ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक वाटा असतात तसच ह्यांचा कुठला ठराविक वेगळा मार्ग असेल". नकळत आता शेवटी खरच मी दुसरीकडे पोहचली, अर्धा तास वाट पाहुन पुन्हा तिथून मागे यायला बस सुटली. जायचं होतं कुठे आणि कुठे मी पोहचली, अनोळख्या ह्या प्रवासात खंबीरपणे मी उभी राहिली. शेवटी जिथे पोहचायचे होते तिकडे सुखरूप मी पोहचली, मन तृप्त झालं पाहून की मी मुळीच नाही घाबरली.. एवढं होऊनही मी एवढंच म्हणणार....... जे काहीही माझ्याबरोबर घडले त्यातून मला काही नवे  अनुभव अनुभवायला मिळाले"...

मुलं व बाई...

....मुलं व  बाई... मुलांनी वर्गात खूप मस्ती केली, त्यांच्या आवाजाने बाई पूर्णपणे हादरून गेली. ओरडून ओरडून तिच्या आवाजाने पाऊल मागे घेतले , तरीही "मी माझे पाऊल मागे घेणार नाही", असे  तिच्या हृदयाने झटकन म्हटले. तिच्या प्रत्येक  प्रेमळ  प्रश्नांचे तिला कटूच उत्तर मिळाले, मुलांना न दुखवता कसं-बसं तिनं वर्गाला व स्वतः ला सांभाळले. तिही कदाचित बालपणीत अशीच करायची...  तिला याची जाणीव होती, मुलांमधील दोष न काढता ती शिक्षिका बनण्यासाठी स्वतःला सक्षम बनवत होती. हळूच करून घड्याळाचा काटा पुढे सरकला..... खोड्या करणारा तो ही तिला आदराने आता बाई म्हणू लागला, भूमी वरती ज्या वीजाबरोबर पाऊस कोसळत होता तोही आता जमिनीच्या कुशीत झरा बनून वाहू लागला. तिने दगडाला मोतीचे रूप देऊन  एक सुंदर लांब माळ केली, स्वतः  कुंभारीण बनून तिने मातीच्या गोळ्यापासून  एक सुंदर आकृती तयार केली