........असे मला वाटते.
वाटतं कधीतरी
अदृश्य मी व्हावे
माझ्या इवल्याश्या दुनियेत
एकटीच मी राहावे
उडणाऱ्या त्या पक्ष्यासारखे
उंच मी उडावे
उडता उडता त्या ढगांशी
खूप गप्पे मारावे
त्या रडणाऱ्या पावसाला
असेच मी पहावे
मग त्याच्यांशी पैज लावून
ढळा ढळा रडावे
कोणाला कधीतरी
डोळेभरून पाहावे
मनातील काटे सगळे
त्याच्या समोर तोडावे
वाटलं कधी तर एकांतात
मुखवटे काढावे
मनातले वादळ कागदावर लिहून
जोरात ते फाडावे
पाण्यावरतील पान बनून
कुठेही दूर वाहावे
लाजाळूचे झाड बनून
स्वतःला स्वतःच सावरावे
पसरलेल्या मोत्यांना
ह्याच हातांनी आवरावे
सूर्याच्या त्या किरणाला
आशेच्या मुठीत धरावे
उजवाडाला पाहून
त्या काळोखाला विसरावे
जीवनातील चक्रव्यूहात
फक्त तुलाच शोधावे
कधीतरी जीवनात
किट्ट काळे पाषाण बनावे
मग त्या वरती चढून
मोठयाने ओरडवे
मागे न वळता
पुढेच चालावे
ढगफुटीचा पाऊस बनून
धो धो कोसळवे
मिठाप्रमाणे समुद्रारात
क्षणात विरघळावे
वाटे मला हे सगळे मी
आयुष्यात माझ्या करावे

Comments
Post a Comment