Skip to main content

Posts

न सुचलेली कविता...

     न सुचलेली कविता... आज डोके का खाजवते? शब्दांच्या गर्दीत का असे हरवते? सुचत नाही आज एकही कविता.. काय  लिहू  माहीत नाही.. परंतु काही लिहिल्याशिवाय  मन रमतही नाही. मध्येच हे काय घडते! यमक जोडताना  मुक्तछंद का डोकावतो.. विचारांच्या पावसात  शब्दांची बीज उगवते पावसात पाणी व उन्हात सूर्य नसल्या सारखी दशा झाली, तरीही ही दशा  नव्याने कवितेचा सूर्य उगवते                                               

अनोळखा प्रवास

अनोळखा प्रवास बाहेर पडले कुठे तरी जायला म्हटले,"मी आज लवकर पोहचणार"! पहाटे बसमध्ये बसली हट्ट होता माझा "आज कशीही करून मी तिकडे जाणार". तशी नवीन नव्हती ती जागा परंतु रस्ता नवा होता, बसीचा तो आवाज कशाचा तरी संकेत देत होता. शेवटी ती ओळखीची जागा नजरेत पडली, म्हटलं बरं झालं ..आता मी पोहचत आली. थोड्या वेळात बघितलं तर सगळं दृश्यच बदललं, मला जिकडे जायचं होतं ते तर मागेच राहिलं. धीर दिलं मनाला  म्हटलं... "दुसऱ्या रस्त्याहून नेत असेल, एका ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक वाटा असतात तसच ह्यांचा कुठला ठराविक वेगळा मार्ग असेल". नकळत आता शेवटी खरच मी दुसरीकडे पोहचली, अर्धा तास वाट पाहुन पुन्हा तिथून मागे यायला बस सुटली. जायचं होतं कुठे आणि कुठे मी पोहचली, अनोळख्या ह्या प्रवासात खंबीरपणे मी उभी राहिली. शेवटी जिथे पोहचायचे होते तिकडे सुखरूप मी पोहचली, मन तृप्त झालं पाहून की मी मुळीच नाही घाबरली.. एवढं होऊनही मी एवढंच म्हणणार....... जे काहीही माझ्याबरोबर घडले त्यातून मला काही नवे  अनुभव अनुभवायला मिळाले"...

मुलं व बाई...

....मुलं व  बाई... मुलांनी वर्गात खूप मस्ती केली, त्यांच्या आवाजाने बाई पूर्णपणे हादरून गेली. ओरडून ओरडून तिच्या आवाजाने पाऊल मागे घेतले , तरीही "मी माझे पाऊल मागे घेणार नाही", असे  तिच्या हृदयाने झटकन म्हटले. तिच्या प्रत्येक  प्रेमळ  प्रश्नांचे तिला कटूच उत्तर मिळाले, मुलांना न दुखवता कसं-बसं तिनं वर्गाला व स्वतः ला सांभाळले. तिही कदाचित बालपणीत अशीच करायची...  तिला याची जाणीव होती, मुलांमधील दोष न काढता ती शिक्षिका बनण्यासाठी स्वतःला सक्षम बनवत होती. हळूच करून घड्याळाचा काटा पुढे सरकला..... खोड्या करणारा तो ही तिला आदराने आता बाई म्हणू लागला, भूमी वरती ज्या वीजाबरोबर पाऊस कोसळत होता तोही आता जमिनीच्या कुशीत झरा बनून वाहू लागला. तिने दगडाला मोतीचे रूप देऊन  एक सुंदर लांब माळ केली, स्वतः  कुंभारीण बनून तिने मातीच्या गोळ्यापासून  एक सुंदर आकृती तयार केली

Your Smile..'तेरी हँसी

       तेरी हँसी          तेरी उस एक हँसी से मुझे दुनियाँ मिलती हैं। तेरे एक आँसू से मेरी आँखे दरियाँ बनती हैं।। तेरे यादो को मैने मोतियों का रूप दिया हैं। ऐसी डोरी जो कभी ना टूटे उनमे उसे पिरोया हैं।।             

Aaj punha

 आज पुन्हा.. ज्याच्या पासून दूर पळत होते पुन्हा आज तोच अंधार पसरला, तोच आता खडक बनून  माझ्या समोर उभा राहिला. रक्ताच्या अश्रूचा झरा  आज पुन्हा वाहू लागला, सुकून गेलेल्या अश्रूंनी दुःखाचा सागर पुन्हा भरून आला.

हे सगळे का घडले?

हे सगळे का घडले? कोणजाणे नेमके काय घडले..... खऱ्या जीवनात तिला  एक सुंदर स्वप्न पडले. हात कुणाचा मध्येच आला, जणू कोणी पडल्यावर आयुष्यात उठवतो तिला. ती उठली,ती सावरली  वाटले  तिला जणू मिळाला तारा, चातक पक्षीच बनून जणू  वाहू लागला तिचा वारा. इंद्रधनुष्य आले जीवनात होते धुके झाले नाहींसे , सगळीकडे आता फक्त  वाटू लागले हिरवे हिरवेसे. मध्येच असे काय घडले... रंग त्यांच्या जीवनात  होते जे कधी हिरवे हिरवे, त्यातच दूरवर पाहताच  वाटे का आज पुन्हा धुके धुके? डोळ्यातील पाणी  सुकून गेले कोण जाणे कुठे ते हरवले, त्याच्या घरी जाणाऱ्या वाटा कदाचित तिच्यावर रुसून बसले परंतु.......हे सगळे असे का घडले? One turning point came in her life.One person came in her life .He was like  a  beautiful dream in the real world .  He was a  wonderful part of her life.. All her problems disappearwd due to his arrival in her life.

कदाचित तुला माहित नसेल...

कदाचित तुला माहीत नसेल की अशीही एक व्यक्ती असेल जी फक्त तुझ्याचसाठी रडेल एवढेच नाही . . . . तर ती तुझ्यासाठीसुद्धा मरेल कदाचित तुला माहीत नसेल.... एक व्यक्ती अशीही असेल  जिचा जीव तुझ्यातच गुंतलेला असेल नकळत तुला, ती फक्त तुलाच पाहत असेल पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल..... एक व्यक्ती अशीही असेल जिचा लोभ तुझी संपत्ती नसून फक्त तुझा प्रेमअसेल जी काळोखातही तुझ्या उजेडासाठी स्वतः जळेन... पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल... एक व्यक्ती अशीही असेल जिचा सूर्य तुलाच पाहून उगवत  असेल जी तुला चंद्रातही पाहत असेल पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...  एक व्यक्ती अशीही असेल जिला सगळीकडे तूच दिसत असेल तुझ्या आठवणीने तिच्या डोळ्यात आसव्यांचा पूर येत असेल पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...