Skip to main content

Posts

जीवनातील रंग

कोण आला हा सैरभैर घेऊनी वर्षाव प्रेमाचा? विसरूनी गेलो रंगात ह्या आपण प्रहार दुःखचा. रंगाने मी बहरूनी गेले थिरकले मी त्या मोरापरी, स्तब्धलेले पंख पसरूनी  फुलले मी  त्याच्या  पंखापरी. हे रंग फक्त रंग नसून अश्रुंच्या स्वप्नातील आहे तो रंग , पाण्याने कदाचित पुसून जाईल तरीही नेहमी  राहील पापण्यांच्या मनासंग काळा,निळा,लाल,पिवळा वेगळे असले तरीही  ते रंगच आहे, रंग खऱ्या जीवनातदेखील रात्रीचे वा दिवसाचे आहे. असे वाटे जणू कोणाच्या तरी  आगमनाचे स्वागत करी, चहू दिशा नव्याने जन्मलेल्या लहानग्या तान्ह्यापरी. उध्वस्तलेले जीवन आता पुन्हा नव्याने जन्मले, रुसून बसलेले वैर आता  प्रेमाचे रंग घेऊनी  उभे राहिले. तुटलेली ती दोरी जाता जाता तो जोडूनी गेला, पसरलेल्या त्या मोत्याना देखील रंगाने आपल्या सावरून गेला. ठेऊन गेला भेटवस्तू रंगपंचमीच्या हा सण, हर्षाने व प्रेमाने आता बहरून गेले हे सगळ्यांचे अंगण. About poem:- I have written this poem on the occasion of 'Rangpanchami' This is not just a fest...

टँक्नोवुमन ( Technowomen)

श्वास गेला चूल फुंकून भरले त्या कौलारात पाणी, फुंकत फुंकत श्वास संपला हरवलेही घरातील राणी कठोर कोरडे हात झाले दुष्काळ पडला या हातावर, हाथ ही आता मारू लगले हेच कोरले आहे काय माझ्या माथ्यावर? प्रहार केले सुईंनी हातांवर रक्त प्रवाह झाला रे आता, दामले हे हात शिवूनी कोणी प्रकाश होऊन तरी एकडे या आता. क्षितिजावर दिसला सूर्य आता जवळच माझ्या तो आला, तंत्रज्ञान विठ्ठल बनून दारात माझ्या उभा राहिला. चांगले दिवस आता आले वाईट दिवस झोपून गेले, रडून संपून आता फक्त हास्य या ओठांवर राहिले Shiwing machine ची साथ मिळाली Washing machine ने वेळाला सावरले, एक बोटाच्या स्पर्शाने कपडे सगळे न्हाऊन आले सहन केले  खूप  शोषण हौसलेल्या  ह्या दैत्यांकडून, Social sites च्या साहाय्याने गर्वाची ही त्याची काठी टाकेन मी मोडून वाटलं तुला की आक्रोश हा कोंडून राहील माझ्या या ओठांतच? Blog , youtube ,app च्या साहाय्याने मांडणार मी साऱ्या ह्या जगातच हात-डोळे माझे रडत होते कांदा-भाजी चिरताना, Chopping machine ने कोरले हास्य या चेहऱ्यावर रडताना रगड़ा आता रुसुन बसला...

मी हरवले

             मी हरवले काही कळतच नाही नेमके काय चालतय मनातं............ कुणाच्या खांद्याचा आधार शोधू ह्रदयातील या चार भिंतीच्या अंधारात. प्रेमाची भाषा वेगळीच असते कधी कुणाला हसवत असते, कधी कुणाला रडवत असते तर कधी ओठांवर हास्य व डोळ्यात पाणी आणत असते. वळणावर भेटतात तुझ्या आठवणी समूहाबरोबरही चालताना आता, सुखद वेदना देऊन गेला कोण जाणी कसं पाहता पाहता. तळवे डांबरात भाजून  गेले निर्जीव आता झाले  हे पाय, नाजूक पद लोखंडी झाले कळेना मलाच मला झाले काय.... रस्त्यावर नाही ती फुले आता फक्त तिथे  काटेच आहे, तोडताना सुध्दा नाव ओठी आसव्याबरोबर तूच आहे. टकटक लावून बसली आता त्या उजेड देणाऱ्या चंद्राकडे, डोळ्यासमोर असूनही नाही तो आता माझ्याकडे. कैदी प्रमाणे झाले हे जीवन बाहेर कसं येऊ सांग ना रे मला? प्रेमाची चावी घेऊन ये जर आठवण कधी आली माझी तुला. खूप महिन्यानंतर जेव्हा मला तू पहिला आसवं जमली डोळ्यांच्या कौलारातं, खुप काही सांगायचे होते परंतु गुंतले नयन फक्त तुला पाहण्यातं. घाबरू नको............... माझं ...

सुखदवेदना..

           सुखदवेदना.........                        संध्याकाळ होताच                                        आठवण तुझी आली मला  ,                                      तुझा हसता चेहरा                                                 डोळ्यांसमोर उभा राहिला.                                               फुलले  माझे मन                          ...

शेवटचा श्वास

           शेवटचा श्वास आई तू कुठे आहेस गं? तुझ्या मांडीवरील झोप आता मला आठवते गं. आठवते तुला जेव्हा तू म्हणायची अंगाई... गोष्ट तुझी ऐकता ऐकता मध्येच मी झोपी जाई. झोपला नाही तर जगच तु डोक्यावर घेई, गोष्टी सांगून तू मला शुर वीरांच्या जगात नेई... आता मी झोपायला जातो  तुझ्या  अंगाईची खूप आठवण येते, पण आई ..... इथे आता बंदुकांची गोळी माझ्यासाठी अंगाई गाते. अश्रू का गं वाहते तू? ताईच्या लग्नासाठी ठेव साठवूनं, उरातून वाहतो अश्रूंची धारा तुझा प्रेम आठवूनं. अगं प्रिये ........... नको ...अशी  रडू नकोस फार अमूल्य आहे अश्रू माझ्यासाठी, बनुच शकलो नाही मी आमच्या संसाराची दुसरी काठी.. मी न पाहिलेल्या आमच्या तान्ह्याला त्याच्या  बापाचा  गोड गोड पापा दे, माझा विचार न करता  तू फक्त त्याला धीर दे. सांग त्या सळसळत्या रक्ताला आम्हा शुर वीरांची गाथा,   मातृभमीचे ऋण फेडायला टेकायचा आहे इकडेच त्याला माथा .

मी कोण?

 तुच.. अरे इकडे तिकडे काय बघतो?   अंधारात का  बसला आहे? काही जमत नाही  म्हणून का तू लपला आहे? वेड्या जरा लक्ष टाक  त्या चंद्राकडे, काळोखात ही  सगळ्यांचं लक्ष आहे  फक्त त्याच्याचकडे. पाहिलं? चंद्रातही भरपूर डाग आहे, म्हणून काय त्याने  उजेड देणं थांबवलं आहे? नाही ना ! मग तू का अंधारात बसुन रडतो ? कलेच्या दिव्याचा प्रकाश  सतत  सगळीकडे पसरत असतो.. तो कसा आहे ,ती कशी आहे याचा विचार तू नको  करू, तर मी कसा आहे?  यावर विचार करायला तू कर सुरू. स्वतःला तुच्छ तू  कधीच लेखू नको, उडणाऱ्या या मनाला  स्वतः त असं कोंडून तरी ठेवू नको! पिंजऱ्यात तडफडणाऱ्या पक्षिसारखं झालं तुझं मन , वाऱ्याच्या झोक्याबारोबर  निवांत जा तू पण.. मोठ मोठी वारूळ बनवणारी मुंगिच असते, सां ग बघू... ती काय इवली नसते? आता बस हं खूप झालं रडणं, डोळे पुसून घे  बघू आणि बघ काय असत जगणं. वादळाला ही न घाबरणारा तो पर्वत बन.. कधीही न विझणारी  अखंड ज्योत बन. कधी ही न तुटणारी  ती दोरी बन ,  दोर...

आकाश व नदी

 Hello friends ! I have come up with small  poem about true love of river...In this I have inserted my own painting to make it interesting and little unique...I hope you will surely like it .........  नदी म्हणाली...... वर्षानु वर्षे कोंडुनी राहले निर्दयी ह्या मातृभूमित, वाहुनी जावया आहे मजला केला मी निश्चय आत.        सांग  आकाश दादा या भूमिला  सागरावरील  प्रेम माझे,    अस्तित्व  नाही त्याचे विना माझ्या  ना अस्तित्व त्याच्या विना माझे. धैर्य मात्र धरुनी चाल आकाश म्हणाला तू हादरु नको, वाटे मधले पाषाण पाहुनी तू मात्र घबरू नको.  निसर्गातील सौंदर्य तुला  जाळ्यात त्याच्या फसवू शकतो,            खंबीरपणे थांब तू कोणतरी फक्त तुझीच वाट पाहतो. प्रेमाची ज्योत पेटवूनी ठेव आत्महत्येला प्रवृत्त करणारी भूमिच आहे, डोंगरावरून कोसळतानाही तिच भूमी तुला सांभाळणार आहे.                   तुझ्या स्वागत...