सुखदवेदना.........
संध्याकाळ होताच
आठवण तुझी आली मला ,
तुझा हसता चेहरा डोळ्यांसमोर उभा राहिला.
फुलले माझे मन
फुलले माझे हृदय,
कोण जाणी सूर्यास्था जागी झाला कसा सुर्योदय...
माहित नव्हते येईल तो दिवस
जेव्हा सुख -दुःख आपण घेईल वाटून , हळू हळू आमच्या जीवनात
मैत्रीचे मेघ आले दाटून.
न सांगता कळलं मला
तू कुठे गेला आहे,
तुझ्या आठवणीत
माझे अश्रू अजूनही रडत आहे.
आपल्या मैत्रीत किती प्रेम आहे माहित आहे दोघांना,
तरीही का आपण दोघेही
देत नाही कळू एक दुसऱ्यांना?
तुझ्या कठोर शब्दात
भरलेलं प्रेम दिसतं मला,
पाहू शकत नाही मी कधीही दुःखी तुला.
जाते दूर तुझ्या जीवनातून
हात माझा कधी धरू नको,
जिचा हात तुझ्या हातात आहे...
तिचा हात कधी सोडू नको.
आपली मैत्री असताना
तुला फक्त दुःखच मिळणार, दुरूनच पाहून तुला
मी माझ्या मनाला सांभाळणार.
माझी चिंता तू करू नको
मी तुझ्या जवळच आहे ,
काहीही झालं तरीही_____
तुझ्या मदतीला मी नेहमीच तयार आहे.
कसले हे खेळ नशिबाचे?
तू नसताना तुला पहावेसे वाटते, परंतु समोर येताच
तुझ्या पासून दूर पळावेसे वाटते.
हे दिवसही लवकर जात नाही
अरे नशीबा! का तू माझा छळ करतो?
तुझ्या विरहात इथे
कोणतरी दररोज मारतो.
तुझ्या प्रेमाच्या समुद्रात मी विरघळून गेले
मग कसं विसरू शकेल रे मी तुला? प्रत्येक क्षणी तू नसताना ही
असल्याचाच भास होतो रे मला...
अश्रू आता थकून गेले
डोळे झाले सुकलेल्या विहिरी परी,
मृगजळ असल्याचा भास होतो
दिसला मला तू आता क्षितिजा परी.
प्रत्येक क्षण होऊन राहीला आहेस तू माझ्या जीवनाचा,
आज तुझ्या आठवणीच्या द्वारे मिळतं
फक्त एक कारण हसण्याचा
खरंच रे....
पडलेल्या ह्या दुष्काळात पाऊसासारखाच तू येऊन गेला
परंतु तप्त उन्हाळ्यातही
तुझ्या सुखदवेदनेचा गारवा तसाच राहिला.
तसाच राहिला......
तसाच राहिला......
About poem:-
This poem is about sad heart touching one sided love story of a girl and their friendship....In this poem a girl is expressing her feelings when she had fallen in love and after taking the decision of going away from that boy so that the boy should not face any problems in his life..The boy is not aware about the reason of going away from his life as she never told or expressed her love......Deep inside the girl is very sad but couldn't express her feelings ...Every single movement ,she miss him...Now she has realised that their friendship might impact the life of boy as he loves another girl..
So she takes hard step of moving away from that boy so that he remain happy ....

Beautiful poem
ReplyDeletenice poem
ReplyDeleteWow!!Kya mast poem hai yaar .... keep it up 😘😘
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice poem👌
ReplyDeleteसुंदर......
ReplyDelete