Skip to main content

मी कोण?


 तुच..
अरे इकडे तिकडे काय बघतो? 
अंधारात का बसला आहे?
काही जमत नाही 
म्हणून का तू लपला आहे?

वेड्या जरा लक्ष टाक 
त्या चंद्राकडे,
काळोखात ही  सगळ्यांचं लक्ष आहे 
फक्त त्याच्याचकडे.

पाहिलं?
चंद्रातही भरपूर डाग आहे,
म्हणून काय त्याने 
उजेड देणं थांबवलं आहे?

नाही ना !
मग तू का अंधारात बसुन रडतो ?
कलेच्या दिव्याचा प्रकाश
 सतत सगळीकडे पसरत असतो..

तो कसा आहे ,ती कशी आहे
याचा विचार तू नको  करू,
तर मी कसा आहे?
 यावर विचार करायला तू कर सुरू.

स्वतःला तुच्छ तू 
कधीच लेखू नको,
उडणाऱ्या या मनाला
 स्वतः त असं कोंडून तरी ठेवू नको!

पिंजऱ्यात तडफडणाऱ्या पक्षिसारखं
झालं तुझं मन ,
वाऱ्याच्या झोक्याबारोबर
 निवांत जा तू पण..

मोठ मोठी वारूळ
बनवणारी मुंगिच असते,
सांग बघू...
ती काय इवली नसते?

आता बस हं
खूप झालं रडणं,
डोळे पुसून घे  बघू
आणि बघ काय असत जगणं.

वादळाला ही न घाबरणारा
तो पर्वत बन..
कधीही न विझणारी 
अखंड ज्योत बन.

कधी ही न तुटणारी
 ती दोरी बन ,
 दोरी तूटली तरीही  
त्यांना जोडणारी ती गाठ बन..

तू म्हणशील ..
मी तर फक्त सर्यकिरणच आहे
सूर्य तर तिथे एकटाच चमकत आहे..
 पण लक्षात ठेव
त्या सूर्याला त्याचे अस्तित्व
सूर्यकिरणांमुळेच लाभलेलं आहे..


 लाव स्पर्धा स्वतःशी
मग पोहचेल तू आकाशी,
तेव्हा तू नक्कीच म्हणशील
की बरं झालं.. भांडलो मी त्या अंधारमय वेळेशी..

About poem:

A time comes in our life , when we feel like our existence on this Earth is of no use .As we know that our life is like a coin which have two sides... Similarly success and failure is a part of our life.A time comes when everything and everywhere becomes dark ..We feel so guilty and depressed that either we end up in taking wrong step or  fill our mind with negative thoughts  .We become demotivated .So my poem is about making ourself self-motivated and maintaining positive mindset....You are the creator and destroy of your own life...So the solution to problems is self introspection..and having positive mindset

Comments

Post a Comment